जैविक कचऱ्यापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करण्याचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 16:40 IST2019-05-15T16:40:41+5:302019-05-15T16:40:47+5:30
त्र्यंबकेश्वर : घरातील टाकाऊ कचºयाची घरातच विल्हेवाट लावून ओला कचरा व सुका कचºयापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करता येईल. याबाबत जनजागृती करण्यासाठी जैविक कचºयापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करण्याबाबतचे प्रात्यक्षिक वायूचे संचालक प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांनी त्र्यंबकेश्वर येथे दाखविले.

जैविक कचऱ्यापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करण्याचे प्रात्यक्षिक
त्र्यंबकेश्वर : घरातील टाकाऊ कचºयाची घरातच विल्हेवाट लावून ओला कचरा व सुका कचºयापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करता येईल. याबाबत जनजागृती करण्यासाठी जैविक कचºयापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करण्याबाबतचे प्रात्यक्षिक वायूचे संचालक प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांनी त्र्यंबकेश्वर येथे दाखविले.
या प्रकल्पासाठी साधारण ४ फूट बाय ४ फूट एवढ्या जागेत ५ किलो कचरा प्रतिदिन जिरविण्याची क्षमता यात आहे. कचºयात घटक कोणते यावर ही क्षमता बदलू शकते, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शंका विचारल्या. या शंकांना मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे, मनोज जांगडा, प्रियदर्शन सहस्रबुद्धे आदींनी उत्तरे दिली.
कचºयापासून गॅस तयार करण्याºया प्रकल्पाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. तसेच डॉ. दिलीप जोशी, हेमंत देवरे, भूषण अडसरे, विजय नाईकवाडी आदींचा सत्कार केला. घनकचरा व्यवस्थापनातून जनजागृती करण्याच्या हेतूने हा कार्यक्र म करण्यात आला होता. यावेळी राजेंद्र खाटीकडे या सफाई विभाग कर्मचाºयाचा सत्कार करण्यात आला. (15टिबीके गॅस)