प्रकल्पग्रस्तांचे मुक्त विद्यापीठासमोर धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 19, 2014 00:58 IST2014-07-19T00:27:21+5:302014-07-19T00:58:00+5:30
प्रकल्पग्रस्तांचे मुक्त विद्यापीठासमोर धरणे आंदोलन

प्रकल्पग्रस्तांचे मुक्त विद्यापीठासमोर धरणे आंदोलन
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी संपादित केलेल्या गोवर्धन शिवारातील जमिनीच्या वहिवाटदारांना किंवा त्यांच्या वारसांना विद्यापीठात स्थायी नोकरीत सामावून न घेतल्याच्या निषेधार्थ वारसदारांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
विद्यापीठ स्थापनेवेळी गोवर्धन शिवारातील अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. यावेळी वहिवाटदारांच्या वारसांना स्थायी नोकरीत सामावून घेतले जाणार असल्याचे विद्यापीठाने आश्वासन दिले होते. परंतु २५ वर्षे उलटूनदेखील विद्यापीठाने एकाही वारसाला नोकरीत सामावून घेतले नसल्याने विद्यापीठ प्रशासनाचा व शासनाचा निषेध करण्यासाठी गोवर्धन ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग पत्करला.
दरम्यान, शनिवारी (दि. १९) विद्यापीठाच्या विरोधात तीव्र धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे प्रमोद जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)