रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने दुरु स्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 19:22 IST2019-03-19T19:20:53+5:302019-03-19T19:22:36+5:30
उमराणे : येथील धनदाई माता मंदिर ते गणपती मंदिर या रस्त्यावरून बाजार समितीत येणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. परिणाम या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरु न ये-जा करणाऱ्या शालेय विद्याथ्यांसह नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे.

उमराणे येथील बायपास रस्त्या दुरु स्ती करण्यासंबंधीचे निवेदन प्रशासक संजय गिते यांना देताना भरत देवरे, दिपक देवरे, धर्मा देवरे व मान्यवर.
उमराणे : येथील धनदाई माता मंदिर ते गणपती मंदिर या रस्त्यावरून बाजार समितीत येणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. परिणाम या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरु न ये-जा करणाऱ्या शालेय विद्याथ्यांसह नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे.
उमराणे येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने या रस्त्यावरु न मालविक्र ीसाठी अवजड मालवाहतूक ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. परिणामी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
खड्यांमधुन दुचाकीधारकांना वाहने चालवणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर बाजार समितीमार्फत मुरु म टाकून दुरु स्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन बाजार समितीचे प्रशासक संजय गिते यांना ग्रामस्थ व शहर शिवसेना शाखा वतीने देण्यात आले.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख भरत देवरे, शहर प्रमुख दिपक देवरे, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, बाळासाहेब देवरे, ग्रामहितवादी संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे, अविनाश देवरे, राजेंद्र जाधव, अमित देवरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.