शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

देशातील लोकशाही धोक्यात-प्रणिती शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:08 IST

देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिकांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत करण्याचे पाऊल उचलले असून, यावरून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. या संकटाचा सामना करून देशातील तरुणच लोकशाहीसोबत देशाचे अखंडत्व अबाधित राखू शकतात, असा विश्वास काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

ठळक मुद्देलोकशाही वाचविणे तरुणांच्या हातातआमदार प्रणिती शिंदे यांचे मत जाती, धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचे प्रयत्न तरुणांना समाजातील संवाद वाढिवण्याचे आवाहन

नाशिक : देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिकांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत करण्याचे पाऊल उचलले असून, यावरून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. या संकटाचा सामना करून देशातील तरुणच लोकशाहीसोबत देशाचे अखंडत्व अबाधित राखू शकतात, असा विश्वास काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एनएसयूआयच्या राज्य व नाशिक जिल्हा कार्यकारिणीतर्फे  काँग्रेस कार्यकर्ता जागर अभियानांतर्गत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२) विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार निर्मला गावित, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, सदस्य अश्विनी अहेर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिन शेख, नगरसेवक वत्सला खैरे, राहुल दिवे, ममता पाटील आदी उपस्थित होते. प्रणिती शिंदे म्हणाल्या, समाजात सुसंवादाची गरज आहे. पंतप्रधानांच्या भाषणांपेक्षा दोन व्यक्ती, दोन गटांमध्ये होणारा संवाद महत्त्वाचा आहे. परंतु गेल्या चार-पाच वर्षांत हा सुसंवाद हरवला आहे. जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याने देशातील लोकशाही संकटात आली आहे. परंतु तरुणांनी समाजात तेढ निर्माण करणाºया व देशाच्या अखंडत्वाला अडचणीत आणू पाहणाºयांविरोधात एकत्रित येऊन  देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करतानात  महिलांना बरोबरीचे स्थान मिळण्याची गरज असून याची शिकवण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरातूनच मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच  पालकांनी मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे करिअर करण्याची संधी देऊन मुलांमध्ये आत्मविश्वासाची निमिर्ती करण्याती गरज व्यक्त के ली.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेसMLAआमदारStudentविद्यार्थी