पेठ नगरपंचायतीतर्फे लोकशाही पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:20 IST2020-01-29T22:08:08+5:302020-01-30T00:20:11+5:30
पेठ येथील नगरपंचायतीच्या वतीने लोकशाही पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला.

पेठ नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना निधी वाटप करण्यात आला. त्याप्रसंगी भास्कर गावित, मनोज घोंगे, कुमार मोंढे, विलास अलबाड, तुळशिराम वाघमारे, दामू राऊत, विशाल जाधव, नम्रता जगताप आदी.
पेठ : येथील नगरपंचायतीच्या वतीने लोकशाही पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला.
पंधरवड्यात लोकशाही बळकट करण्यासाठी विविध उपक्र म राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नवमतदार नोंदणी, महिला मतदारांची संख्या वाढविणे, निवडणूक प्रक्रि येची माहिती, शालेय मुलांच्या निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पेठच्या हुतात्मा स्मारक येथील कार्यक्र मात जि.प. सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते पेठ शहरातील दिव्यांग लाभार्थ्यींना निधीचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, सभापती विलास अलबाड, उपसभापती पुष्पा पवार, तुळशिराम वाघमारे, भागवत पाटील, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, मुख्य अधिकारी लक्ष्मीकांत कहार, चंद्रकांत भोये, नागेश भालेराव यांचेसह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. भारत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.