शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हुकूमशाही नव्हे लोकशाही हवी; मुंढे यांना भुजबळांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:39 IST

‘मुंढे यांनी आयुक्त म्हणून शहराच्या विकासाचा कारभार करावा, हुकूमशहासारखे वागून लोकशाही पायदळी तुडवू नये, महापालिके त त्यांनी संयमाने काम करावे असा सल्ला देत त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाची वज्रमूठ अधिक घट्ट केल्याशिवाय राहणार नाही’ असा रोखठोक इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी राजीव गांधी भवनावर काढलेल्या मोर्चाद्वारे दिला.

नाशिक : ‘मुंढे यांनी आयुक्त म्हणून शहराच्या विकासाचा कारभार करावा, हुकूमशहासारखे वागून लोकशाही पायदळी तुडवू नये, महापालिके त त्यांनी संयमाने काम करावे असा सल्ला देत त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाची वज्रमूठ अधिक घट्ट केल्याशिवाय राहणार नाही’ असा रोखठोक इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी राजीव गांधी भवनावर काढलेल्या मोर्चाद्वारे दिला.  महापालिकेकडून करण्यात आलेली करवाढ, बंद केलेल्या अंगणवाड्या, सिडकोवर केलेली वक्रदृष्टी अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.१०) दुपारी अडीच वाजता मुंबईनाका येथील राष्टवादीच्या कार्यालयापासून भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते.  दरम्यान, भुजबळ यांनी शिष्टमंडळासह मुंढे यांची भेट घेणे पसंत के ले नाही. माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह शिष्टमंडळाने तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन निवेदन दिले व विविध मागण्यांवर चर्चा केली; मात्र मुंढे यांनी त्यांच्या सर्व मागण्यांबाबतचा खुलासा करत कुठल्याहीप्रकारे बेकायदेशीर काम महापालिका प्रशासनाकडून केले जात नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकची करवाढ अत्यंत कमी असल्याचेही सांगितले. यावेळी राजीव गांधी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भुजबळ यांनी उपस्थित शेकडो मोर्चेकऱ्यांना उद्देशून बोलताना सर्वप्रथम मुंढे यांच्या कारभाराचा समाचार घेतला. त्यानंतर भाजपा आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, अंगणवाड्यांचा प्रश्न संपूर्ण राज्यात कोठेही उद्भवलेला नाही. मुंढे यांनी शहरातील अंगणवाड्या बंद करून अंगणवाडीसेविकांचा उदरनिर्वाह अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. गोरगरीब नाशिककरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुकारलेला या एल्गाराच्या माध्यमातून लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखविला. मुंढे यांची वागणूक चुकीची आहे. त्यांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांना मान देत शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे. नगरसेवकांचे हक्क डावलण्याचा प्रयत्न मुंढे यांनी करू नये, असा सल्लाही भुजबळ यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार जयवंत जाधव, देवीदास पिंगळे, शेफाली भुजबळ, गटनेता गजानन शेलार, गुरुमित बग्गा, कविता कर्डक, प्रेरणा बलकवडे, समिना मेमन, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.शिष्टमंडळाची चर्चा निष्फळमाजी खासदार समीर भुजबळ यांच्यासमवेत शिष्टमंंडळाने तुकाराम मुंढे यांची दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी बैठक कक्षात मुंढे यांना विविध मागण्यांचे पाच पानांचे निवेदन शिष्टमंडळाने सादर केले. मुंढे यांनी शिष्टमंंडळाची बाजू ऐकून घेत वरील सर्व मागण्यांवर सविस्तर स्पष्टीकरण देत करवाढ अन्य शहरांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. सिडकोमधील रहिवाशांनी ड्रेनेज, जलवाहिन्यांवर बांधकाम केले आहेत, त्यामुळे मी त्यावर प्रथम लक्ष केंद्रित केले आहे. बससेवा महामंडळ तोट्यात चालवू शकत नाही, त्यामुळे ती महापालिकेला स्वीकारावी लागणार, क्लस्टर योजना राबविण्याबाबत शासकीय स्तरावर प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगून प्रशासनाची बाजू मांडली.‘वाह रे भाजपा तेरा खेल...’राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये महिला आघाडी, युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सहभागी मोर्चेकºयांनी ‘तुकाराम मुंढे हाय हाय’, ‘मोदी सरकार-फ डणवीस सरकार हाय हाय’, ‘नाशिककरांवर लादलेली करवाढ रद्द करा’, ‘वाह रे भाजपा तेरा खेल, नाशिक का विकास हुवा फेल’, ‘नागपूरचा करताय विकास, मग दत्तक नाशिकला का ठेवलं भकास’, ‘अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय रद्द करा’, ‘गोदावरी प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे’, ‘भाजपा सरकारचे क रायचे काय..., अशा विविध घोेषणा देत शहर परिसर दणाणून सोडला. यावेळी मोर्चेकºयांनी झळकविलेल्या घोषणांच्या फलकांनी लक्ष वेधले.भुजबळ यांचे पायी मार्गक्रमणमुंबईनाका सर्कल, महामार्ग बसस्थानकमार्गे गडकरी चौक, त्र्यंबकनाका, जुने सीबीएस सिग्नल, शरणपूररोड यामार्गे राजीव गांधी भवनापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात छगन भुजबळ यांनीही संपूर्ण मोर्चाच्या मार्गावर पायी चालणे पसंत केले. त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांच्यासाठी वाहन व्यवस्था होती. मात्र भुजबळ यांनी वाहनात बसण्यास नकार देत मोर्चेकºयांसमवेत पायी राजीव गांधी भवनापर्यंत येणे पसंत केले. त्यामुळे मोर्चेकºयांचा उत्साह अधिक वाढला होता. भुजबळांनी मागील अनेक महिन्यांनंतर प्रथमच अशाप्रकारे मोर्चात सहभाग घेतल्याने त्यांचे मार्गक्रमण नागरिकांसाठी लक्षवेधी ठरले.

 

 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळtukaram mundheतुकाराम मुंढे