शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भ्रमणध्वनी मनोऱ्याचे काम थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 13:20 IST

कळवण :कळवण शहरातील गणेशनगर भागातील पुंजाराम पाटील कॉलनी परिसरात खाजगी भ्रमणध्वनीच्या मनोरा उभारणीचे काम सुरु आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन काम बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्दे*माझ्या घरात वृद्ध आई , वडील , लहान मुले आहेत शेजारीच हा भ्रमणध्वनीमनोरा सुरु झाल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे हा मनोर्यास आमचा विरोध आहे. त्याचे काम तात्काळ थांबवावे. -योगेश कोठावदे, कळवण.

हे काम न थांबल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा कळवणचे माजी सरपंच एकनाथ जगतापसह स्थानिक नागरिकांनी दिला आहे.रहिवाशी भागात भ्रमणध्वनी मनोºयाच्या लहरींमुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. आण ित्याचा परिणाम वृद्ध, गरोदर महिला व लहान मुलांवर होतो. त्यामुळे या भागात भ्रमणध्वनी मनोरा नको अशी भूमिका घेतली आहे. मात्र नगर पंचायतची कुठलीही परवानगी न घेता शहरातील गणेशनगर भागातील पुंजाराम पाटील कॉलनीत खाजगी कंपनीचा मोबाईल मनोरा उभारणीचे काम जोरात सुरु आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे हरकत घेतली आहे. त्यानुसार नगरपंचायतीने संबंधितताना नोटीसही पाठवली आहे. मात्र स्थानिक नागरिक व नगर पंचायत यांच्या विरोधास न जुमानता संबंधित ठेकेदाराने दांडगाई करीत काम सुरूच ठेवले आहे. संबंधित ठेकेदार नगर पंचायतीच्या अधिकार्यांचेही ऐकत नसल्याने दाद मागायची कोणाकडे असा यक्ष प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर पडला आहे. हे काम तात्काळ थांबवावे अन्यथा नगर पंचायती समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.संबंधित भ्रमणध्वनी मनोर्याच्या कामाबाबत आमच्याकडे स्थानिक नागरिकांची तक्र ार आली आहे. त्यानुसार आमचे कर्मचारी स्थानिक ठिकाणी जाऊन काम बंद करण्यासंबधीत नोटीस देऊन आले आहेत. काम बंद करण्यास सांगितले आहे. काम करण्यास कुठलीही परवानगी देण्यात आलेले नाही . तरी सदर ठेकेदाराने काम सुरु सूर ठेवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल .-सचिन माने ,मुख्याधिकारी, कळवण -----------------आमच्या घरा शेजारी खाजगी भ्रमणध्वनी कंपनीचा मनोरा उभारणीचे काम सुरु आहे. त्यास आमचा विरोध आहे. या मनोर्याच्या कामास नगर पंचायत प्रशासनाने परवानगी देऊ नये . तसे न झाल्यास नगर पंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करून आमरण उपोषण करण्यात येईल. -एकनाथ जगताप,माजी सरपंच, कळवण -