संगणक परिचालकांच्या मागण्या; १५ जूनला मुंबईत मोर्चा

By Admin | Updated: June 3, 2014 02:20 IST2014-06-02T01:54:06+5:302014-06-03T02:20:42+5:30

नाशिक : ग्रामपंचायत पातळीवरील संग्राम कक्षातील कर्मचार्‍यांना अल्प मानधनावर शासन राबवून घेत असून, याविरोधात कर्मचार्‍यांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे़

The demands of computer operators; The rally in Mumbai on June 15 | संगणक परिचालकांच्या मागण्या; १५ जूनला मुंबईत मोर्चा

संगणक परिचालकांच्या मागण्या; १५ जूनला मुंबईत मोर्चा

 नाशिक : ग्रामपंचायत पातळीवरील संग्राम कक्षातील कर्मचार्‍यांना अल्प मानधनावर शासन राबवून घेत असून, याविरोधात कर्मचार्‍यांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे़ शासनाच्या या कंत्राटी धोरणामुळे युवकांचे नुकसान व शोषण होते. ेयाविरोधात १५ जूनला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे़ या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ‘आयटक’चे महाराष्ट्र सरचिटणीस सुकुमार दामले यांनी केले़ शहरातील मराठा मंगल कार्यालयात झालेल्या संगणक परिचालकांच्या राज्यव्यापी मेळाव्यात दामले बोलत होते़ या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सचिव राजू देसले होते़ कंत्राटी धोरणाचा निषेध करीत शासन अल्प मानधन देऊन युवक-युवतींचे शोषण करीत असल्याचे त्यांनी सांगितले़ संग्राम कक्षात ग्रामपंचायत पातळीवर कार्यरत संगणक परिचालकांना केवळ ३८०० ते ४१०० इतके अल्प मानधन मिळते़ त्यांना शासनाने किमान ८००० रुपये मानधन देऊन सन्मानाची वागणूक देण्याची गरज आहे़ या अन्यायाविरोधात करण्यात येणार्‍या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही देसले यांनी केले़ मेळाव्याला २७ जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते़ व्यासपीठावर श्याम काळे, प्रसाद घागरे, ओंकार जाधव, सुनील घटाळे, हिवराज आडके आदि उपस्थित होते़ ठरावांचे वाचन हेमंत पगार यांनी केले़ प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष योगेश नवले यांनी केले़ सूत्रसंचालन ओंकार जाधव यांनी, तर आभार सुरेश पाटील यांनी मानले़ मेळाव्याचे संयोजन राकेश देशमुख, शांताराम बेंडकुळे, बापू मोरे, प्रिया सोनवणे आदिंनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: The demands of computer operators; The rally in Mumbai on June 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.