लासलगाव : पालखेड डावा कालव्याचे आवर्तनातून पाणीचोरी संदर्भात ३९ शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.सन २०१३ व २०१६ मध्ये पाटबंधारे विभागाने पालखेड डावा कालव्याचे आवर्तनातून पाणी चोरी प्रकरणी वनसगाव ,खडक माळेगाव, खानगाव कोटमगाव, थेटाळे ,उगाव आदी गावातील ३९ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन सदर गुन्हे मागे घेण्याची मागणी निफाड पंचायत समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे तालुका संघटक शिवा पाटील सुरासे, शहर प्रमुख माधव शिंदे, दत्तात्रेय मापारी, संतोष संधान यांनी केली. यावेळी केसरकर यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून गृहमंत्रालयाला अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.
पाणीचोरीप्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 18:10 IST
३९ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
पाणीचोरीप्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी
ठळक मुद्दे केसरकर यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून गृहमंत्रालयाला अहवाल पाठविण्याचे आदेश दिले