पाणी गळती थांबविण्याची मागणी

By Admin | Updated: December 4, 2015 21:48 IST2015-12-04T21:47:56+5:302015-12-04T21:48:35+5:30

पाणी गळती थांबविण्याची मागणी

Demand for water leakage | पाणी गळती थांबविण्याची मागणी

पाणी गळती थांबविण्याची मागणी

येवला : शहरात लक्कडकोट भागात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्याची नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी दखल घेत भेट देऊन पाइपलाइन तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक दत्ता निकम होते.
दुष्काळी परिस्थितीत रस्त्यावर पाणी वाहतानाचे दिसताच मनसे कार्यकर्त्यांनी या पाण्यात वृक्षारोपण केले. मनसे शहर अध्यक्ष गौरव कांबळे, किरण सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पाणी सोडल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असते व हजारो लिटर पाणक्ष रस्त्यावर वाया जाते. याबाबत पालिकेने काळजी घ्यावी, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.
यावर नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे म्हणाले की, पालिका पाणी गळतीबाबत दक्षता घेत असते. परंतु नागरिकांनीही पाणी गळती कुठे होत असेल? तर ही बाब पालिकेच्या लक्षात आणून द्यावी. त्याबाबत कार्यवाही केली जाईल. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Demand for water leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.