वाहतूक सेवा पूर्ववत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:07 IST2020-08-12T22:32:21+5:302020-08-13T00:07:08+5:30

चांदवड : तालुक्यासह सर्वत्र सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत सुरू करावी व सर्वसामान्य जनतेला सर्वच सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चांदवड एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.

Demand to undo transportation services | वाहतूक सेवा पूर्ववत करण्याची मागणी

चांदवडसह सर्वत्र सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील यांना देताना मंगेश केदारे, आनंद बनकर, योगेश जगताप, देवीदास बनकर, साहेबराव सोनवणे, संजय जाधव, उत्तम वानखेडे, सुनील कापसे, ज्ञानेश्वर हिरे, अंबादास वानखेडे, यादव वानखेडे व कार्यकर्ते.

ठळक मुद्देकोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे ८० टक्के रुग्णांनी दाखविली

चांदवड : तालुक्यासह सर्वत्र सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत सुरू करावी व सर्वसामान्य जनतेला सर्वच सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चांदवड एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.
यावेळी तालुकाध्यक्ष मंगेश केदारे, आनंद बनकर, संजय भंडागे, योगेश जगताप, संतोष केदारे, साहेबराव सोनवणे, अनिताताई शेख, देवीदास बनकर, संजय जाधव, ज्ञानेश्वर हिरे, उत्तर वानखेडे, अंबादास वानखेडे, राजेंद्र गांगुर्डे, यादव वानखेडे, संजय जाधव आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.
गेल्या २२ मार्चपासून सुमारे सहा महिन्यापासून कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यात गरीब हातावर पोट असलेल्या लोकांना रोजगार, उद्योग व्यवसाय व अर्थव्यवहार बंद पडले आहेत. ते व्यवसाय त्वरित सुरू करावेत तर कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे ८० टक्के रुग्णांनी दाखविली. १५ टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोेनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहे....या आहेत मागण्याकोरोना रोखण्यासाठी आरोग्यविषयक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे व सर्व व्यवहार सुरू करावे, सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरू करावी, गणपती उत्सवासाठी खासगी बस वाहतूक सेवा बुकिंग सुरू झाले तर खासगी सेवा चालू होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यास काय अडचण आहे. तरी सरकारने एसटी व बेस्टच्या सेवा तुरळक सुरू केल्या असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. ती पूर्ववत करून जिल्हाबंदी त्वरित उठवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. वंचित आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच ही मागणी केली आहे.

Web Title: Demand to undo transportation services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.