शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मागणी वाढल्याने दोन हजार मेगावॅटचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 19:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे: उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढल्याने परळी व्यतिरिक्त राज्यातील सर्वच वीज निर्मिती केंद्रातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती ...

ठळक मुद्देपुर्णक्षमतेने विजनिर्मिती: निर्मिती १६ हजार तर मागणी १८हजार मेगावॅट

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे: उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढल्याने परळी व्यतिरिक्त राज्यातील सर्वच वीज निर्मिती केंद्रातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होत आहे. सद्या महानिर्मितीच्या थर्मल, गॅस, हायड्रो, सोलर व इतर स्त्रोतांच्या माध्यमातून १६,४१९ मेगावॉट वीज निर्मिती होत आहे. मात्र मागणी १८,४५८ मेगावॉट असल्याने सध्या दोन हजार मॅगावॅटची तूट भरून काढावी लागत आहे. दरम्यान, प्रॉडक्शन कॉस्ट जास्त असल्याने सद्या परळीचे सर्व संच बंद ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.राज्यातील सर्वज वीजनिर्मिती संचातून जास्तीतजास्त वीजनिर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे. कोराडीचे २१० मेगावॉटचे २ व ६६० मेगावॉटचे ३ अशा पाच संचांची निर्मिती क्षमता २४०० मेगावॉट असून १४०१ मेगावॉट वीज निर्मिती सुरु आहे. नाशिकच्या २१० मेगावॉटच्या तीनही संचातून ४४८ मेगावॉट वीज निर्मिती सुरू आहे. वास्तविक या केंद्राची क्षमता ६३० मेगावॅट इतकी आहे. भुसावळ येथे २१० चा एक व ५०० चे दोन संच मिळून तेथील उत्पादन क्षमता १२१० मेगावॉट आहे. सद्या २१० चा संच बंद आहे; तर ६३० च्या दोन संचांमधून ४४८ मेगावॉट वीज निर्मिती सुरु आहे.पारसला २५० च्या दोन संचांची क्षमता ५०० आहे. तेथे ४५९ मेगावॉट वीज निर्मिती सुरु आहे. परळी येथे २१० चे दोन व २५० चे तीन संच मिळून ११७० निर्मिती क्षमता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेथील सर्व संच बंद ठेवण्यात आले आहेत.अशीही तेथे पाण्याची समस्या भेडसावते आहे. मात्र वीज निर्मिती खर्च जास्त होत असल्याने तेथील संच देखील बंद ठेवल्याचे सांगितले जाते.खापरखेडा येथे २१० चे चार व ५०० चा एक अशा पाच युनिटसची क्षमता १३४० मेगावॉट आहे. तेथील सर्व युनिटस कमी अधीक प्रमाणात सुरु असून सद्यस्थितीत ८९८ मेगावॉट वीज निर्मिती करीत आहेत.चंद्रपूर येथे २१० चे दोन व ५०० चे पाच अशा सात संचांंची निर्मिती क्षमता २९२० मेगावॉट आहे.तेथील सर्व संच पूर्ण क्षमतेने सुरु असून सद्या २४७० मेगावॉट वीज निर्मिती होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकPower Shutdownभारनियमन