सक्तीची कर्जवसुली थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST2021-05-05T04:23:45+5:302021-05-05T04:23:45+5:30
सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे गत वर्षभरापासून देशात व राज्यात आर्थिक चक्राची गती मंदावली आहे. ...

सक्तीची कर्जवसुली थांबविण्याची मागणी
सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे गत वर्षभरापासून देशात व राज्यात आर्थिक चक्राची गती मंदावली आहे. ‘ब्रेक द चेन’, टाळेबंदीमुळे सर्वच व्यावसायिक, हातमजूर, गृह उद्योग आदी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे निर्माण होणारे रोजगार व उत्पन्न यावर दुष्परिणाम होऊन आर्थिक नियोजन कोलमडले आहे. राष्ट्रीय बँक, खासगी बँक, सहकारी बँक, खासगी वित्तीय संस्था आदी संस्थांचे कर्जाचे हप्ते भरण्यास जनता असमर्थ ठरत आहे. या संस्था हप्ते भरण्यासाठी तगादा लावत असल्याने जनतेवर प्रचंड आर्थिक व मानसिक तणाव निर्माण होत आहे.
शहरातील नागरिकांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये. वसुलीला पुढील तीन ते चार महिन्यांच्या स्थगितीसह वाढीव व्याज, दंड, लेट फी आकारणीत माफी मिळावी या मागणीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नेवीलकुमार तिवारी, जगदीश गोऱ्हे, शुभम वाघ, राम गवळी, अर्जुन भाटी, मंगेश बिरारी, निलेश सोनवणे, लतीकेश सोनवणे, दीपक पाटील, रोहित वारूले, आशिष पोरवाल, बंटी शेलार, सचिन परदेशी, निलेश पाटील, सागर पगारे, दीपक खैरनार, आबा चौधरी, हार्दिक कासलीवाल आदी उपस्थित होते.