पिंपळगाव ते साकुरफाटा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची निवेदनाद्वारे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 18:25 IST2020-01-05T18:24:27+5:302020-01-05T18:25:37+5:30
घोटी : पिंपळगाव मोर ते साकुर फाटा मार्गे पांढुर्ली पर्यंत या रस्त्यावर खूप खड्डे आहे. सदर खड्डे त्वरीत बुजविण्याकरीता रॉट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

घोटी-सिन्नर महामार्गावरील खड्डे बुजविन्यात यावे या विषयाचे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना देतांना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, मा. पं. समिती उपसभापती पांडुरंग वारुंगसे आदींसह शिष्टमंडळातील कार्यकर्ते.
घोटी : पिंपळगाव मोर ते साकुर फाटा मार्गे पांढुर्ली पर्यंत या रस्त्यावर खूप खड्डे आहे. सदर खड्डे त्वरीत बुजविण्याकरीता रॉट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
सिन्नर - घोटी या महामार्गावरील घोटी ते पिंपळगाव दरम्यान रस्त्याचे कॉँक्रीटीकरणाचे कामकाज चालू आहे, परंतु पिंपळगाव मोर ते साकुर फाटा मार्गे पांढुर्ली पर्यंत या रस्त्यावर खूप खड्डे आहे.
सदर खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवावे व रस्त्यावरील वाहतुकीत वाहनचालकांना प्रवाशांना होत असलेला धुळीचा त्रास थांबवावा यासंदर्भात शनिवारी (दि. ४) रोजी इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, माजी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांच्या शिष्टमंडळाकडून इगतपुरी नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान घोटी-सिन्नर महामार्ग संदर्भात पिंपळगाव मोर ते साकुरफाटा या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे सदर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दैनंदिन प्रवासधारक प्रवास करतात त्यात प्रामुख्याने शेतकरी वर्ग तसेच नोकरदार, महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, शेतकरी, दूध विक्र ेते, व्यापारी या सर्वांना साकुर ते पिंपळगाव मोर मार्गे घोटी या रस्त्यावरून प्रवास करतांना रोजच धुळीचा व प्रचंड खड्यांचा त्रास सहन करावा लागतो.
तसेच याच रस्त्यालगत धामणगाव दरम्यान एसएमबीटी रु ग्णालय येत असून याच रस्त्यावरून एसएमबीटी रु ग्णालयात सतत उपचारासाठी रु ग्णांची ये जा सुरू असते या रस्त्यावरील जीवघेण्या खड्यांमुळे रु ग्णालयात जाणाऱ्या रु ग्णांना देखील सर्रासपणे या खड्डेमय रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग वारु ंगसे, निवृत्ती जाधव, गेणू गाढवे, राम शिंदे, प्रा.विलास खापरे, साहेबराव लगड, नवनाथ लगड आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
प्रतिक्रि या
घोटी-सिन्नर या महामार्गावरील पिंपळगाव ते साकुर फाटा पांढुरली दरम्यान रस्त्यावर जीवघेणे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यावरून दररोज ये जा करणार्या प्रवासी वाहनधारकांना जीवघेण्या प्रवासाबरोबरच धुळीचा प्रचंड सामना करावा लागत आहे तरी संबंधित रस्ता प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे व धूळ प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- बाळासाहेब गाढवे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस)