बारागावपिंप्रीत बॅँकेची शाखा सुरु करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 17:54 IST2019-06-30T17:51:58+5:302019-06-30T17:54:12+5:30
सिन्नर : तालुक्यातील बारागावपिंप्रीसह परिसरातील गावांमध्ये कोणतीही बॅँक नसल्याने व्यवहारासाठी युनियन बॅँकेच्या सिन्नर शाखेत जावे लागत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. बारागावपिंप्री येथे युनियन बॅँकेचे आठवड्यातून दोन दिवस शाखा उघडून ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांनी केली. याबाबत युनियन बॅँकेचे सिन्नर शाखेचे व्यवस्थापक स्वप्नील हुतके यांना निवेदन देण्यात आले.

बारागावपिंप्रीत बॅँकेची शाखा सुरु करण्याची मागणी
युनियन बॅँक आॅफ इंडिया, सिन्नर शाखा ही बारागावप्रिंपी, निमगाव, गुळवंच, पाटपिंप्री, सुळेवाडी, केपानगर, व हिवरगाव या गावांतील अर्थवाहिनी आहे. या गावांतील ग्राहकांना शेती, व्यवसाय व घरासाठी कर्जपुरवठा करण्यासाठी बॅँक सहकार्य करत असते. ग्राहक व ग्रामस्थांचा विश्वास असल्याने बॅँकेमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आठवड्यातून दोन दिवस बॅँकेने बारागावपिंप्री येथे शाखा सुरु ठेवून ग्राहकांच्या अडचणी दुर कराव्यात, अशी मागणी गोसावी यांनी केली. नव्याने रूजू झालेले बॅँक व्यवस्थापक हुतके यांना निवेदन देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी अधिकारी योगेश गिते, लेखाधिकारी राजाराम जोंधळे, योगेश सोनवणे, शिवाजी शिंदे, प्रीतम देवरे, राहुल खांदोडे, गोविंद बोडके, तेजस ठुबे आदी उपस्थित होते.