एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:49 IST2021-01-20T20:33:36+5:302021-01-21T00:49:57+5:30
पेठ : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर अवलंबून रहावे लागते.

एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
पेठ : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर अवलंबून रहावे लागते. पेठ तालुक्यात सध्या जोगमोडी व करंजाळी ही दोनच केंद्रे सुरू असून शेतकऱ्यांना जवळपास ४० ते ५० किलोमीटर प्रवास करून धान्य आणावे लागते. म्हणून पेठ व कोहोर या दोन ठिकाणची बंद पडलेली खरेदी केंद्रे सुरू करावीत या मागणीचे निवेदन पेठच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार संदीप भोसले यांना दिले.
करंजाळी येथे उमेद अंतर्गत बचतगट कार्यशाळा
पेठ : पंचायत समिती उमेद प्रकल्पांतर्गत तालुक्यातील महिला बचतगटांची एकदिवसीय कार्यशाळा करंजाळी येथील समाज मंदिरात पार पडली. तालुका राहुल जाधव, अनिल खंबाईत यांनी महिलांना कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील महिला बचतगट प्रतिनिधी उपस्थित होते.