कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:48 IST2020-09-05T23:25:59+5:302020-09-06T00:48:18+5:30
मनमाड : कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे शहरात आॅक्सिजन बेड युक्त कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे.

कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
मनमाड : कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे शहरात आॅक्सिजन बेड युक्त कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात प्रत्येकाच्या घरापर्यंत कोरोना पोहोचला असून, या विषयी शासकीय स्थरावर कुठलीच यंत्रणा काम करताना दिसून येत नाही. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा उभारावी व शहरात लवकरात लवकर कोविड सेंटर उभारावे तसेच रेल्वेचे हॉस्पिटल त्याब्यात घ्यावे. रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात परिसरातील चांदवड, नांदगाव, येवला येथे छोट्या शहरात कोविड सेंटर उपलब्ध आहेत. परंतु सव्वा ते दीड लाख लोकसंख्येच्या शहरात कोविड सेंटर नाही. कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.