वाढीव दराची मुद्रांक विक्री थांबविण्याची मागणी
By Admin | Updated: August 10, 2014 02:01 IST2014-08-10T01:55:51+5:302014-08-10T02:01:54+5:30
वाढीव दराची मुद्रांक विक्री थांबविण्याची मागणी

वाढीव दराची मुद्रांक विक्री थांबविण्याची मागणी
मालेगाव : येथील प्रांत व तहसील कार्यालय तसेच नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुद्रांकांची दहा ते वीस रुपये अशा वाढत्या दराने विक्री होत आहे. त्यामुळे शहर - तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब विद्यार्थ्यांची आर्थिक लुट होऊन त्यांच्या शैक्षणिक व इतर महत्त्वाच्या कामांमध्ये अडवणूक होत आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रीतील हा गैरप्रकार व पैशांच्या लुटीचा प्रकार थांबवावा, अशी मागणी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे तहसिलदार दीपक पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रा. मधुकर कापडणीस, शहरमंत्री जयेश जंगम, कुणाल काबरा, सहमंत्री चंदन कैचे, शुभम खैरनार, प्रणव बच्छाव, ऋषिकेश गोसावी आदि उपस्थित होते.