सोयाबीनच्या बियाण्यांना मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:30+5:302021-06-01T04:11:30+5:30
शेतकरी बांधवांनी कृषी सेवा केंद्रात सोयाबीन बियाणे उपलब्ध न झाल्यास मागील वर्षाचे घरगुती बियाणे वापरावे, बियाणे वापरण्यापूर्वी बियाण्याची उगवण ...

सोयाबीनच्या बियाण्यांना मागणी वाढली
शेतकरी बांधवांनी कृषी सेवा केंद्रात सोयाबीन बियाणे उपलब्ध न झाल्यास मागील वर्षाचे घरगुती बियाणे वापरावे, बियाणे वापरण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून पाहावी, त्या बियाण्याची उगवण क्षमता सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास ते बियाणे पेरणी योग्य आहे, असे समजून पेरण्या करण्याचे आवाहन येवला तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच पेरणी करण्यापूर्वी त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करून घ्यावी. बीज प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या पिकांनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशक, कीटकनाशक आणि रायझिबियम यासारख्या जिवाणू संवर्धकाचा वापर केला जातो. बीज प्रक्रियेमुळे पिकावर रोग, किडी यांचा प्रादुर्भाव कमी होतो. उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादन व उत्पन्नात वाढ होते, तसेच परिसरातील सोयाबीनसह मका पिकाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक असल्याने बियाणे निवडताना संबंधित कंपनी बियाण्याचे वाण, उगवण क्षमता, याची तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.