वृद्धांच्या समस्या सोडवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:22 IST2020-12-31T22:10:28+5:302021-01-01T00:22:37+5:30

पेठ : तालुक्यातील निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवून कागदपत्रांसाठी सातत्याने माराव्या लागणाऱ्या चकरा कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Demand for solving the problems of the elderly | वृद्धांच्या समस्या सोडवण्याची मागणी

वृद्धांच्या समस्या सोडवण्याची मागणी

ठळक मुद्दे तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन



पेठ : तालुक्यातील निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवून कागदपत्रांसाठी सातत्याने माराव्या लागणाऱ्या चकरा कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून तहसीलदार संदीप भोसले यांना दिलेल्या निवेदनात तालुक्यातील वृद्धापकाळ व निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने लक्ष घालून वृद्धांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर युवा कार्याध्यक्ष गणेश गवळी यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


पेठ तालुक्यातील वृद्धांच्या समस्यांबाबत तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देताना गणेश गवळी व नागरिक. (३१ पेठ १)

Web Title: Demand for solving the problems of the elderly