त्वचा संरक्षणासाठीच्या उत्पादनांना मागणी

By Admin | Updated: December 7, 2015 22:37 IST2015-12-07T22:36:50+5:302015-12-07T22:37:19+5:30

बाजारपेठेत रेलचेल : नामांकित सौंदर्य प्रसाधनांमध्ये स्पर्धा

Demand for skin protection products | त्वचा संरक्षणासाठीच्या उत्पादनांना मागणी

त्वचा संरक्षणासाठीच्या उत्पादनांना मागणी

पूर्वा सावजी, नाशिक
हिवाळ्यातील बोचऱ्या थंडीचा जोर वाढू लागला असून, त्वचेचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारची उत्पादने बाजारपेठेत दाखल झाली आहेत. यात वेगवेगळ्या क्रिम, बॉडीलोशन आदिंचा समावेश आहे.
हिवाळ्यात त्वचा, केस, चेहऱ्याची काळजी घेणे आवश्यक असते. यात अनेक कंपन्यांनी आपापली वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने बाजारात आणली आहेत. बॉडी लोशन, मॉईश्चराइझर, बॉडी क्रिम्स, फूट क्रिम्स अशा प्रकारची उत्पादने बाजारपेठेत बघावयास मिळत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडी पडायला सुरुवात झाली असून, नामांकित औषधी कंपन्यांनी आपली उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणली आहेत. एका उत्पादनाचे अनेक प्रकार ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध आहेत. या क्रिम्सप्रमाणेच हिवाळ्यातील त्वचेचे रक्षण करणाऱ्या साबणांमध्येदेखील अनेक प्रकार आहेत.
प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी उपयुक्त असतात. हिवाळ्यात बॉडी केअर, मॉईश्चराइझर अशा गोष्टी उपयुक्त असतात.
ग्राहकांची मागणी या गोष्टींना जास्त असते. अशावेळी नामांकित कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर सूट देतात. अत्यंत कमी दरात, परंतु उच्च प्रतीची उत्पादने देण्यासाठी कंपन्यांची चढाओढ लागलेली असते आणि म्हणून उत्पादनांवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट मिळते. काही उत्पादने ही लहान मुलांसाठी, घातक ठरू शकतात. म्हणून या कंपन्या खास लहान मुलांसाठी काही वस्तू उत्पादित करतात. अशा प्रकारची उत्पादनेदेखील बाजारात उपलब्ध आहेत. कोरडी त्वचा, तेलकट त्वचा अशा त्वचेच्या विविध प्रकारांसाठी वेगवेगळी उत्पादने बाजारात आहेत आणि ती लहान-मोठ्या आकारात उपलब्ध आहेत.
ग्राहकांना भुरळटीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून अनेक उत्पादनांच्या स्पर्धा दिसून येतात; परंतु याच माध्यमातून काही जाहिरातींमधूनही ग्राहकांना भुरळ पाडण्यात येते. त्या उत्पादनांवरील आकर्षक सूट बघून ग्राहक जाहिरातींवर भाळतात. उत्पादने उपयुक्त आहे की हानिकारक हेदेखील ग्राहकांनी योग्य खात्री करूनच त्वचा संरक्षणासाठी वापर करावा, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Demand for skin protection products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.