अवैध दारूविक्री व्यवसाय बंद करण्याची मागणी
By Admin | Updated: July 5, 2014 00:26 IST2014-07-04T22:11:08+5:302014-07-05T00:26:16+5:30
अवैध दारूविक्री व्यवसाय बंद करण्याची मागणी

अवैध दारूविक्री व्यवसाय बंद करण्याची मागणी
ममदापूर : येथील गावात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध देशी दारूविक्री व्यवसाय तत्काळ बंद करण्याची मागणी आदिवासी महिलांसह ग्रामस्थांनी नुकतीच एका शिष्टमंडळासह तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार शरद मंडलिक यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ममदापूर गावात आदिवासी वस्तीत मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूविक्री होत असल्याने, व्यसनाधीनतेत मोठी वाढ झालेली आहे. या दारूमुळे अनेक संसार उघड्यावर येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने ही अवैध विक्री तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी गंगूबाई ठाकरे, सुंदरबाई सोनवणे, विमल ठाकरे, यशोदाबाई पवार, ताराबाई मोरे, गुलाब मोरे, श्रावण मोरे, नानू मोरे आदिंसह
मोठ्या संख्येने आदिवासीबांधव, ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. (वार्ताहर)