धान्य वितरण कार्यालयातील दलालांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:37+5:302021-07-09T04:10:37+5:30
मालेगाव : शहर धान्य वितरण कार्यालयात दलालांची टोळी कार्यरत आहे. कार्यालयाबाहेरच बनावट शिधापत्रिका तयार करून जनतेची फसवणूक केली ...

धान्य वितरण कार्यालयातील दलालांचा बंदोबस्त करण्याची मागणी
मालेगाव : शहर धान्य वितरण कार्यालयात दलालांची टोळी कार्यरत आहे. कार्यालयाबाहेरच बनावट शिधापत्रिका तयार करून जनतेची फसवणूक केली जात आहे. या दलालांचा बंदोबस्त करावा. नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे धान्य व शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसीफ शेख यांनी प्रभारी धान्य वितरण अधिकारी प्रमोद मोरे यांची बुधवारी भेट घेऊन केली आहे. शहरातील २५ ते ३० दलालांकडून २ ते १५ हजार रुपये घेऊन बनावट शिधापत्रिका वाटप केल्या जात असल्याची तक्रार नागरिकांनी मालेगावच्या राष्ट्रवादी भवन कार्यालयात केली होती. या तक्रारींची माजी आमदार आसीफ शेख यांनी गंभीर दखल घेत धान्य वितरण कार्यालय गाठले. या कार्यालयातील एजंटांचा बंदोबस्त करावा. बनावट पद्धतीने पिवळे रेशन कार्ड बनविले जात आहे. यासाठी २५ ते ३० दलाल कार्यरत आहेत. २ ते ३ हजार रुपये सर्वसामान्य नागरिकांकडून उकळले जात आहे. दलालांकडे बनावट स्वाक्षरीचे शिक्के आहेत. शिधापत्रिकेची नोंद नसताना शिधापत्रिका देऊन जनतेची फसवणूक केली जात आहे. याची चौकशी करावी. शहरातील लोकप्रतिनिधींकडून धान्य वितरण कार्यालयाच्या प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही माजी आमदार शेख यांनी केला आहे. शिधापत्रिकांसाठी जनतेने थेट धान्य वितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. स्वस्त धान्य दुकानदार व वितरण प्रणालीवरून राजकारण केले जात आहे. कार्यालयात कायमस्वरूपी पुरवठा अधिकारी नेमावा. शहर संजय गांधी योजनेच्या कार्यालयात पूर्णवेळ तहसीलदारांची नेमणूक करण्याची मागणीही माजी आमदार शेख यांनी केली आहे.
फोटो फाईल नेम : ०७ एमजेयुएल ०७ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव शहर धान्य वितरण कार्यालयात बोगस शिधापत्रिकांबाबत धान्य वितरण अधिकारी प्रमोद मोरे यांच्याकडे तक्रार करताना माजी आमदार आसीफ शेख.
070721\493907nsk_29_07072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.