आगासखिंड शिवारात पिंजरा लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:19+5:302021-04-15T04:13:19+5:30
------------------- सिन्नरला इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशीन भेट सिन्नर : सिन्नर ग्रामीण रुग्णालयास एका दात्याने सुमारे सव्वा लाख किमतीचे इलेक्ट्रॉनिक ...

आगासखिंड शिवारात पिंजरा लावण्याची मागणी
-------------------
सिन्नरला इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशीन भेट
सिन्नर : सिन्नर ग्रामीण रुग्णालयास एका दात्याने सुमारे सव्वा लाख किमतीचे इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर मशीन भेट दिले. हे स्वयंचलित यंत्र असून हवेतील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात पुरवला जातो. सदर मशीन सिन्नर ग्रामीण रुग्णालयात बसविण्यात येणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत मशीन सुपूर्द करण्यात आले.
------------------
देशी दारूची अवैध वाहतूक
सिन्नर : माळेगाव येथे स्विफ्ट कारमधून देशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी संशयित दत्तात्रेय शंकर सांगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दारूसह कार पोलिसांनी ताब्यात घेतली. दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वाहनाची झडती घेण्यात आली. त्यात संत्राच्या २३९ देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या. एक लाख ६९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
--------------
गुळवंच येथे आठ दिवसांचा जनता कर्फ्यू
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच येथे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यू सुरू केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. ग्रामस्थ, व्यावसायिक व ग्रामपंचायत प्रशासन यांंच्यात बैठक घेऊन सदर निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २० एप्रिलपर्यंत सर्व व्यवहार बंद असणार आहे. रुग्णालये व औषध दुकाने वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे.
-------------
पास्ते येथे जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन
सिन्नर : तालुक्यातील पास्ते ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन माजी सरपंच जयंत आव्हाड, बायफ संस्थेचे अधिकारी जितीन साठे यांच्या हस्ते करण्यात आले.