गोसावी समाज दफनभूमीसाठी हिवरे येथे जागा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:54 IST2019-03-28T21:54:19+5:302019-03-28T21:54:54+5:30
सिन्नर : दशमान गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी हिवरे ग्रामपंचायतीने गावाच्या बाहेरील ग्रामपंचायतीच्या बखळ जागेत जागा द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन समाजाच्या वतीने सरपंचासह प्रशासनाला देण्यात आले.

गोसावी समाज दफनभूमीसाठी हिवरे येथे जागा देण्याची मागणी
सिन्नर : दशमान गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी हिवरे ग्रामपंचायतीने गावाच्या बाहेरील ग्रामपंचायतीच्या बखळ जागेत जागा द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन समाजाच्या वतीने सरपंचासह प्रशासनाला देण्यात आले.
समाजाच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून दफनभूमीसाठी जागेची मागणी करण्यात येत आहे. अनेकदा ग्रामस्थांमध्येही याबाबत चर्चा झाली आहे; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून याबाबत कुठलाही निर्णय होत नसल्याने निवेदनात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. दफनभूमीची सध्याची असलेली जागा खूपच कमी पडत असून, समाजातील कुणाचे निधन झालेच तर समाधीसाठी जागा शिल्लक राहिलेली नाही.
सरपंच विमल बिन्नर व ग्रामसेवक किशोर विभूते यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी गोसावी समाजाच्या मागणीवर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन बिन्नर यांनी दिले. ही जागा देण्यात शासकीय स्तरावर काही अडचणी असून, या अडचणी लवकरात लवकर दूर करून जागा देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे विभूते यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपसरपंच त्र्यंबक आगविले, ग्रामपंचायत सदस्य रामनाथ बिन्नर, पोपट बिन्नर, सुनील गोसावी, मंगल गोसावी, माधव गोसावी, सचिन गोसावी, सदाशिव गोसावी, सुनंदा गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, विलास गोसावी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. प्रशासनाला निवेदन; मागण्यांकडे वेधले लक्षभविष्यात अजून अडचण वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीने आपल्या बखळ जागेतील १० गुंठे जागा समाजाच्या दफनभूमीसाठी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामसेवकांना ३० आॅगस्ट २०१८ रोजीही निवेदन देण्यात आले होते; मात्र त्यावर आजपर्यंत कुठलाही निर्णय झाला नसल्याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले.