वाळू उपसा थांबविण्याची मागणी
By Admin | Updated: October 25, 2015 22:21 IST2015-10-25T22:20:20+5:302015-10-25T22:21:24+5:30
वाळू उपसा थांबविण्याची मागणी

वाळू उपसा थांबविण्याची मागणी
मालेगाव : तालुक्यातील सवंदगाव येथील गिरणा नदीपात्रातील वाळू उपसा थांबविण्यात यावा, अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे सरपंच अरुण शेवाळे, योगेश शेवाळे आदिंनी निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील सवंदगाव येथील गिरणा नदीपात्रातील व धरणक्षेत्रातील वाळूचा लिलाव शासकीय अधिकारी व वाळू चोरांनी संगनमताने घडवून आणलेला आहे. तालुक्यातील हा परिसर दहा वर्षांपासून सातत्याच्या दुष्काळाने त्रस्त झालेला आहे. या भागातील शेतकरी पाण्याअभावी देशोधडीला लागलेले आहेत. त्यामुळे गिरणा नदीपात्र व धरणक्षेत्रातील वाळू उपसा करण्यास या परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वाळू उपसा करण्यास एकजुटीने विरोध करीत तसा ठराव एकमताने मंजूर केलेला आहे. यापूर्वी शासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत, असे असतानाही शासकीय अधिकारी व संबंधित वाळूमाफियांनी संगनमताने सदर लिलाव घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. त्यात वाळूचा उपसा झाल्यास भविष्यात या विहिरी उजाड होऊन पाणीपुरवठा योजना पूर्णत: कोलमडणार आहे.(वार्ताहर)
डांगसौंदाणेत कोजागरी
पौर्णिमेनिमित्त जलाभिषेक
जोरण : बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील ग्रामदैवत जलदुर्गा माता मंदिरात जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष सोपान सोनवणे यांनी जलदुर्गा मातेला अभिषेक करण्यात आला. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.