मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 00:17 IST2021-07-05T22:59:55+5:302021-07-06T00:17:43+5:30
मानोरी : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी
मानोरी : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्यातील मुस्लिम समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय मागासलेला असून समाजास शैक्षणिक आणि शासकीय ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाची मात्र अंमलबजावणी झालेली नसून मुस्लिम समाजाला तत्काळ शैक्षणिक आणि शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन मुस्लिम समाजाकडून पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे. यावेळी येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघ अल्पविभागाचे अध्यक्ष कलीम पठाण, नाशिक जिल्हाध्यक्ष अकबर शेख, निसार शेख, वसीम सैय्यद, शहीद सैय्यद, हारुन शेख आदी उपस्थित होते.