शिधापत्रिका बदलण्याची मागणी
By Admin | Updated: January 21, 2016 22:18 IST2016-01-21T22:17:15+5:302016-01-21T22:18:55+5:30
शिधापत्रिका बदलण्याची मागणी

शिधापत्रिका बदलण्याची मागणी
पाटोदा : येवला तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांमार्फत शासनाचे कमी दरातील धान्य वाटपाबरोबरच विविध शासकीय योजना राबविल्या जातात. स्वस्त धान्य दुकानातील धान्य घेण्यासाठी शासनाकडून पांढरी, पिवळी, केशरी शिधापत्रिका पुरविली जाते. परंतु, या तिन्ही शिधापत्रिकांचे वाटप तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून झालेले नाही. २० वर्षांपूर्वीच्या लाभाधारकांच्या शिधापत्रिका अतिशय खराब झाल्या आहेत. काही शिधा पत्रिका फाटल्या असून, व्यविस्थत नोंदी दिसत नाहीत. शासनाने शासकीय दवाखान्यामध्ये उपचारासाठी शिधापत्रिकेचेही बंधन घातले आहे. त्यामुळे केशरी शिधापत्रिका लाभार्थींना मिळणे अपेक्षित आहे. परंतु, शिधापत्रिका उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे मारीत आहेत. तहसील कार्यालयामध्येही शिधापत्रिकेचा साठा असायला हवा होता. परंतु, येथेही कोऱ्या शिधापत्रिका मागील सहा महिन्यांपासून संपलेल्या आहेत. नवीन प्रस्ताव देऊनही अनेक दिवस शिधा पत्रिका मिळत नाहीत. येवला येथील तहसील कार्यालयामध्ये नवीन कोऱ्या शिधापत्रिकांचा तुटवडा निर्माण झाला असून, लाभार्थींना शिधापत्रिकांसाठी पायपीट करावी लागत आहे. (वार्ताहर)