पेठच्या ग्रामीण भागातील रस्ते दुरु स्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 17:22 IST2020-08-29T17:22:10+5:302020-08-29T17:22:57+5:30
पेठ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पेठ तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्ते दुरु स्ती करण्याची मागणी केली जात आहे.

पेठच्या ग्रामीण भागातील रस्ते दुरु स्तीची मागणी
ठळक मुद्देरस्ते खचल्याने वाहतुकीला अडथळे
पेठ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पेठ तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्ते दुरु स्ती करण्याची मागणी केली जात आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना पेठ तालुक्यासाठी वरदान ठरली होती. वर्षानूवर्ष दळणवळणापासून वंचित असलेल्या गावखेडयांना या रस्त्याव्दारे जोडले गेले. मात्र सद्यस्थितीत या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुसळधार पाऊस व चढउताराचा प्रवासाामुळे रस्ते खराब झाले असून, अवघड वळणावर तसेच तीव्र उतारावर रस्ते खचल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने तालुक्यातील रस्त्यांची दुरु स्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
(29पेठ1)