पिंपळपट्टी-भगवती लाॅन्स रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:14 IST2021-05-24T04:14:30+5:302021-05-24T04:14:30+5:30

जेलरोड प्रभाग क्रमांक १८ मध्ये असलेल्या पिंपळपट्टी ते भगवती लॉन्स या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा जनसुराज्य शक्ती ...

Demand for repair of Pimpalpatti-Bhagwati Lance Road | पिंपळपट्टी-भगवती लाॅन्स रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

पिंपळपट्टी-भगवती लाॅन्स रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

जेलरोड प्रभाग क्रमांक १८ मध्ये असलेल्या पिंपळपट्टी ते भगवती लॉन्स या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा जनसुराज्य शक्ती पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराज गायकवाड यांनी दिला आहे.

गेले अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने या रस्त्यावरून जाताना पादचारी व दुचाकी चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. किरकोळ अपघातही घडत आहे. जेलरोडच्या पिंपळपट्टी ते भगवती लॉन्स हा रस्ता अतिशय रहदारीचा आहे. या रस्त्यावरून सतत वाहनचालकांची व नागरिकांची ये-जा सुरू असते. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची अतिशय वाईट स्थिती झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असल्याने अपघात होऊन वाहन चालक जखमी होत आहेत. नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले होते. पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होणार आहे. त्याअगोदर नगरसेवक, तसेच प्रशासनाने लक्ष देऊन या रस्त्याचे डांबरीकरण करावे व नागरिकांना होणारा त्रास थांबवावा. मनपा प्रशासनाने लक्ष न दिल्यास वेळप्रसंगी नागरिकांच्या सहभागाने जनसुराज्य शक्ती पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही विलास राज गायकवाड यांनी दिला आहे.

Web Title: Demand for repair of Pimpalpatti-Bhagwati Lance Road