ओव्हरब्रिजच्या दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:17 IST2019-12-27T23:16:46+5:302019-12-27T23:17:34+5:30
मनमाड शहरातून जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजची अवस्था दयनीय झाली असून, या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मनमाड येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या दुरुस्तीसाठी निवेदन देताना रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, गुरुकुमार निकाळे, विलास अहिरे, स्वराज देशमुख आदी.
मनमाड : मनमाड शहरातून जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजची अवस्था दयनीय झाली असून, या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या पुलाचा कॅँपकडील भाग जीर्ण झाला असून सिनियर इन्स्टिट्यूटकडील भिंत फुगलेली आहे. या पुलावरून इंदूर-पुणे महामार्गावरील अवजड वाहतूक सुरू असल्याने हा पूल केव्हाही ढासळू शकतो. तरी या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अन्यथा रिपाइं शहर शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र अहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमार
निकाळे, प्रमोद अहिरे, महेंद्र वाघ, विलास अहिरे, मोजेस साळवे, रुपेश अहिरे, शेखर अहिरे, पप्पू दराडे, बाबा शेख, स्वराज देशमुख, सुरेश कसबे, काका भालेराव आदींच्या स्वाक्षºया आहे.