नाल्यातील गाळ काढण्याची मागणी
By Admin | Updated: September 26, 2016 00:20 IST2016-09-26T00:19:45+5:302016-09-26T00:20:06+5:30
मालेगाव : जगदीश गोऱ्हे यांचे आयुक्तांना निवेदन

नाल्यातील गाळ काढण्याची मागणी
मालेगाव : कॅम्पातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसण्याची शक्यता असून पंचशीलनगर जवळील नाल्यामध्ये साचलेला गाळ काढण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे जगदीश गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसापासून कॅम्प परिसराला नदीचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. हेरंब गणेश मंदिर, सिंधी कॉलनी, हिंमतनगर, सानेगुरुजीनगर, पंचशीलनगर, शीतलामातानगर, गवळीवाडा, पुष्पाताई हिरेनगर आदि भागामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने हानी झाली.
महानगरपालिकेने पूरपाण्याचे पुरातन नाले, भायगाव रोड, हेरंब गणेश मंदिरमार्ग, भायगावरोड, सराव पाठशाळा, झुलेलाल कॉलनी, पंचशीलनगर, शीतलामातानगर, हिंमतनगर, पोलीस वसाहत, हर्षिता कोड्रिंक्स, गोरवाडकरवाडा, शिवाजीवाडी आदि भागांच्या नाल्यांची त्वरित पाहणी करावी. पूरपाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करावी. मोसमनदीला पूर आल्यास संपूर्ण जुने कॅम्प पूरपाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पंचशीलनगरजवळील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. त्याची सफाई करण्यात यावी, रस्त्यावर मोठमोठे पाण्याचे डबके साचले असून तेथे मुरूम टाकण्यात यावा, असे शेवटी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)