पंचवटी : हनुमाननगर येथे सुरू असलेल्या मद्यविक्री दुकानामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर मद्याचे दुकान त्वरित हटवावे, अशी मागणी परिसरातील शेकडो महिलांनी केली आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क व आडगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. परिसरातील गणेश हौसिंग सोसायटीत असलेल्या रमण हाईट्स इमारतीच्या गाळ्यात काही दिवसांपासून मद्य विक्रीचे दुकान सुरू झाल्याने या दुकानामुळे मद्यपींचा उपद्रव आणि वावरही वाढला आहे. सदर दुकानामुळे परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाने तत्काळ दुकान हटवावे, अशी मागणी नगरसेवक सुरेश खेताडे, अमोल सूर्यवंशी, गोकुळ मते, राहुल दराडे, महेश सानप, गणेश गिते, किरण इंगळे आदींसह परिसरातील महिला व नागरिकांनी केली आहे.
मद्याचे दुकान हटविण्याची मागणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:13 IST