सुळे डाव्या कालव्याला पूरपाणी सोडण्याची मागणी
By Admin | Updated: September 23, 2015 23:10 IST2015-09-23T23:09:51+5:302015-09-23T23:10:32+5:30
सुळे डाव्या कालव्याला पूरपाणी सोडण्याची मागणी

सुळे डाव्या कालव्याला पूरपाणी सोडण्याची मागणी
खामखेडा : कळवण, देवळा तालुक्यातील शेतीसाठी संजीवनी ठरणारा सुळे डावा कालव्याला पूरपाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सुळे कालव्याअंतर्गत येण्याऱ्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात दोन-तीन दिवस धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पुनद ,चणकापूर आदि धरणे भरून पुराचे पाणी गिरणा व पुनंद नदीपात्रात सोडण्यात आले. परंतु पुनद नदीवर अर्जुन सागर बंधारा बाधन्यात आला आहे. या धरणातुन सुळे डावा कालवा तयार करण्यातआला आहे. सदर कालव्याच्या अतर्गत कळवन व देवळातील खामखेडा , सावकी गावाचे मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येते . सदर कालव्याचे काम खामखेडा गावाच्या ३७ की मी पर्यत होऊन चार वर्षाहुन अधिक कालावधी झाला आहे. मात्र आजपर्यत कलव्याचे पाणी खामखेडा गावापर्यत आले नाही . जुलै महिन्या मघ्ये धरण्याच्या पाण्याचा पिळकोस गावाच्या शिवेपर्यतच्या गावांना झाला होता.
पुनंद धरणाचे पूरपाणी सुळे डाव्या कालव्यात सोडण्यात येऊन खामखेडा ३७ किमी आले तर या कालव्याच्या खाली पिळकोस येथील मेंगदर व खामखेडा येथील लायकेश्वोर जवळील धरणे पुर पाण्याने भरून जमिनीतिल पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी होईल. पाटबंधारे विभागाने त्वरित सुळेडाव्या कालव्यास पुरपाणी सोडण्यात यावे आशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
चिचोंडी संस्थेच्या अध्यक्षपदी मढवई
येवला : चिचोंडी बु. विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी साहेबराव मढवई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन चेअरमन त्र्यंबक निकम यांनी राजीनामा दिल्याने आवर्तन पध्दतीने मढवई यांची निवड करण्यात आली. बैठकीत भागवत खराटे, नामदेव मढवई यांनी चेअरमन पदासाठी साहेबराव मढवई यांच्या नावाची सुचना मांडली. (वार्ताहर)