हरणबारी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी
By Admin | Updated: November 16, 2015 22:13 IST2015-11-16T22:12:43+5:302015-11-16T22:13:13+5:30
दुष्काळ : पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

हरणबारी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी
द्याने : मोसम परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असून, सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या विहिरींची भूजल पातळी खालावली आहे. इतरत्रही जलस्त्रोत मृत झाले आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, हरणबारी धरणातून आवर्तन सोडावे अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
हरणबारी धरणक्षेत्रात उशिरा का होईना समाधानकारक पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, मोसम नदीपात्रजवळील गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाणी सोडल्यास परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा शेतकरी सोसत असल्याने शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हा प्रवक्ते हंसराज वडगुले, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व शशिकांत कोर, जयवंत कोर, पंढरीनाथ अहिरे उपस्थित होते. (वार्ताहर)