शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सुळे डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:40 IST

सुळे डाव्या कालव्याचे रब्बी हंगामासाठी आवर्तन ठरविण्यासाठी विसापूर येथे आयोजित पाणी परिषदेत कालव्याचे पाणी खामखेड्यासाठी सोडण्यात यावे तसेच खामखेडा व सावकी येथील पाझर तलावासाठी गेट टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

खामखेडा : सुळे डाव्या कालव्याचे रब्बी हंगामासाठी आवर्तन ठरविण्यासाठी विसापूर येथे आयोजित पाणी परिषदेत कालव्याचे पाणी खामखेड्यासाठी सोडण्यात यावे तसेच खामखेडा व सावकी येथील पाझर तलावासाठी गेट टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. चालू वर्षी तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याने रब्बी हंगामात सुळे डाव्या कालव्याचे तीन आवर्तन ठरविण्यासाठी सावकी, खामखेडा, पिळकोस, विसापूर, भादवन, बिजोरे, घनगरपाडा आदी भागातील शेतकऱ्यांनी आमदार जे. पी. गावित यांच्या अध्यक्षतेखाली विसापूर येथे सुळे डावा कालवा पाणी आरक्षण परिषदेचे आयोजन केले होते. दरवर्षी उन्हाळ्यात सुळे डाव्या कालव्यास रब्बी हंगामासाठी पिळकोस गावाच्या शिवापर्यंत पाणी सोडण्यात येते, तेव्हा हे पाणी पुढे खामखेडा-सावकी शिवारापर्यंत सोडण्यात यावे तसेच या काळव्याखाली खामखेडा व सावकी पाझर तलावसमोरील कालव्यास गेट टाकण्यात यावे अशी मागणी खामखेडा येथील शेतकºयांनी पाणी परिषदेत केली. खामखेडा व सावकी शिवारातील कालव्यास पाझर तलावाच्या नाल्यावर गेट टाकल्यास पावसाळ्यात या कालव्यास पाणी सोडल्यास पूरपाण्याने हे तलाव भरल्यास भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. सुळे डाव्या कालव्याच्या पाझर तलावासमोरील नाल्यावर गेट टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच बापू शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, माजी सरपंच संतोष मोरे, दादाजी बोरसे, संजय बच्छाव, दीपक मोरे, साहेबराव शेवाळे, रमेश शेवाळे, भिका शेवाळे आदी शेतकरी उपस्थित होते.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदतचालू वर्षी अल्पपावसामुळे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. आताच शिवारातील विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याअभावी लागवड केलेली पिके सोडून देण्याची वेळ अनेक शेतकºयांवर आली आहे. विहिरींना पाणी नसल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा सुळे डाव्या कालव्याचे पाणी खामखेडा व सावकी शिवारापर्यंत सोडल्यास थोड्याफार प्रमाणात पाणी मुरून विहिरींना पाणी उतरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी