सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:51 IST2017-08-01T00:51:48+5:302017-08-01T00:51:53+5:30
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदेच्या खोºयात जल सत्याग्रह सुरू आहे. त्यांच्या या सत्याग्र्रहाला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध समविचारी संघटनांच्या वतीने एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी
नाशिक : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदेच्या खोºयात जल सत्याग्रह सुरू आहे. त्यांच्या या सत्याग्र्रहाला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध समविचारी संघटनांच्या वतीने एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सरदार सरोवर प्रकल्पाला लागू असलेल्या नर्मदा जलविवाद न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार बुडित येण्यापूर्वी किमान सहा महिने विस्थापित धरणग्रस्त कुटुंबांना सर्व नागरी सोयी-सुविधांसह त्यांचे पुनर्वसनस्थळ पुनर्स्थापित करणे बंधनकारक असल्याचे शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. सरदार सरोवर प्रकल्पातील उर्वरित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन येत्या तीन महिन्यांत करण्यात यावे आणि त्वरित खोरे रिकामे करावे आणि मध्य प्रदेश सरकारने लाभार्थ्याला प्रत्येकी साठ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. लाक्षणिक उपोषणामध्ये मूलभूत हक्क आंदोलन, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, मानव अधिकार संवर्धन संघटना, आम आदमी पार्टी, मानव उत्थान मंच, राष्टÑ सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.