कामगारांना नोंदणीकृत करण्याची मागणी
By Admin | Updated: October 19, 2015 21:47 IST2015-10-19T21:46:34+5:302015-10-19T21:47:06+5:30
पालकमंत्र्यांना निवेदन : नोंदणीची खोटी माहिती दिल्याप्रकरणी चौकशी व्हावी

कामगारांना नोंदणीकृत करण्याची मागणी
नाशिकरोड : मध्य रेल्वेभुसावळ विभागाने दिलेली माहिती व नाशिक माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने दिलेल्या माहितीत मोठी तफावत माहितीच्या अधिकारात आढळून आली असून, संबंधितांची चौकशी करावी, तसेच अनोंदणी कामगारांना नोंदणीकृत करून घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांना राष्ट्रीय माथाडी वाहतूक आणि जनरल श्रमिक उत्कर्ष सभा यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडे कामगारांची कमी नोंदणी दाखवून मोठ्या प्रमाणात लेव्ही वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच नाशिकरोड मालधक्क्यावर सीमेंट, धान्य, खते व स्टील उतरविण्यात येते. याठिकाणी नोंदणीकृत कामगारांची ४५० इतकीच संख्या आहे. कार्टिंग एजंट व कामगार मंडळ संगमताने उर्वरित काम अनोंदणी कामगारांकडून करून घेतात. त्यामध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आहे. निवेदनावर कामगार नेते विजय कांबळे, श्रमिक उत्कर्ष सभेचे जिल्हाध्यक्ष विशाल साळवे, विलास वानखेडे, मिलिंद शेजवळ, रवि हांडगे, शंकर आवारे, रिंकी ढालिया, भीमचंद चंद्रमोरे, अभिलाश थोरात आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)