निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी
By Admin | Updated: July 5, 2014 00:22 IST2014-07-04T22:18:19+5:302014-07-05T00:22:39+5:30
निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी

निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी
चांदवड : कांद्याचे निर्यातमूल्य कमी करून जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळावे, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नितीन गर्जे यांना देण्यात आले आहे.
केंद्र शासनाने नुकतेच कांद्याचे निर्यातमूल्य प्रतिटन ३०० डॉलरवरून ५०० डॉलर केले आहे. तसेच कांद्याचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे. चालू वर्षी दुष्काळ पडल्याने मुळातच कांद्याचे उत्पादन अत्यल्प झाले आहे. गारपिटीमुळे काढलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे कांद्याचे भाव कमी होऊन कांदा उत्पादकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे कांद्याचे निर्यातमूल्य कमी करावे, जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून कांदा वगळण्यात यावा, कांदा पिकाला हमीभाव द्यावा आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात यावा. असेही निवेदनात म्हटले आहे. चांदवड-देवळा मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष नितीन अहेर, देवा वाघ, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खैरे, का. भा. अहेर, राजकुमार संकलेचा, यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले आहे. (वार्ताहर)