नाशिकच्या राणेनगर बोगद्यालगत सिग्नल यंत्रणेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:23 AM2018-01-20T11:23:21+5:302018-01-20T11:23:50+5:30

बोगद्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही. सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहनधारक नियमांची पायमल्ली करताना दिसतात.

Demand for Ranenagar signal | नाशिकच्या राणेनगर बोगद्यालगत सिग्नल यंत्रणेची मागणी

नाशिकच्या राणेनगर बोगद्यालगत सिग्नल यंत्रणेची मागणी

googlenewsNext


नाशिक : शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आणि सिग्नल यंत्रणेअभावी होणाºया वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले असून, येथे तातडीने सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी होत आहे.
उपनगरांतील नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी राणेनगर बोगद्यालगत असणाºया मुंबई महामार्ग समांतर रस्त्याचा विविध वापर करतात. तसेच इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर यांसह परिसरातील नागरिक बोगद्यामधून सिडको व अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करतात. त्यामुळे दिवसभर बोगद्यामधून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. बोगद्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही. सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहनधारक नियमांची पायमल्ली करताना दिसतात. त्यामुळे दररोज लहानमोठे अपघात होऊन हमरीतुमरीच्या घटनाही घडत आहेत. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची वाट न बघता येथे तातडीने सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
राणेनगर चौफुली येथील बोगद्यामधून वाहनधारक मार्गक्र मण करताना जणू काही स्पर्धाच करीत असतात. वाहनधारक आडवे तिडवे प्रवेश करीत असल्याने अनेक वेळेस वाहतुकीची कोंडी होते.

Web Title: Demand for Ranenagar signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.