‘त्या’ रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला शिक्षा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:15 IST2021-01-20T04:15:21+5:302021-01-20T04:15:21+5:30

इगतपुरी : शहरातील तळेगाव येथील रहिवासी असलेला लोहमार्ग पोलीस कर्मचारी राहुल मोरे याने व त्याच्या पत्नीने लहान मुलांना ...

Demand for punishment of 'that' railway police officer | ‘त्या’ रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला शिक्षा देण्याची मागणी

‘त्या’ रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला शिक्षा देण्याची मागणी

इगतपुरी : शहरातील तळेगाव येथील रहिवासी असलेला लोहमार्ग पोलीस कर्मचारी राहुल मोरे याने व त्याच्या पत्नीने लहान मुलांना अमानुष मारहाण करून शरीरावर चटके दिले. या घटनेच्या निषेधार्थ इगतपुरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन दिले .

दि . १५ रोजी झालेल्या घटनेत लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलीस नोकरी करीत असलेला राहुल मोरे , त्याची दुसरी पत्नी यांनी लहान मुलांना क्रूरतेने मारणाऱ्या अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व समाजात पुन्हा अशी घटना घडू नये. संबंधितांना कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष वसीम सैयद, महेश शिरोळे, रघुनाथ तोकडे,माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, विष्णू पाटील चव्हाण, गोरख बोडके, अनिल भोपे, रामदास गव्हाणे, पंढरी डाके, नगरसेवक संपत डावखर, मिलिंद हिरे उपस्थित होते .

-----------------------

इगतपुरी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना सर्वपक्षीय निवेदन देताना वसीम सय्यद, महेश शिरोळे, रघुनाथ तोकडे, गोरख बोडके आदी. (१९ इगतपुरी)

===Photopath===

190121\19nsk_10_19012021_13.jpg

===Caption===

१९ इगतपुरी

Web Title: Demand for punishment of 'that' railway police officer