येवला : तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या मुदतपूर्व बदलीचा निषेध करून, मराठा मावळा संघटनेने तहसिलदार वारूळे यांची बदली रद्द करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.पालकमंत्री छगन भुजबळ यांना सदर निवेदन देण्यात आले. तहसीलदार वारु ळे यांची मुदतपूर्व झालेली बदली चुकीची आहे. वारु ळे यांनी अत्यंत चोखपणे काम पार पाडले असून कोविड-19 काळातील त्यांचे काम वखाणण्याजोगे आहे.प्रशासकीय पातळीवरही त्यांचा उत्तम समन्वय दिसून आला असून तालुक्यात सर्वसामान्यांच्या हिताची अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. मुदतपूर्व बदली वारूळे यांचेवर तसेच तालुक्यावर अन्याय करणारी असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष देविदास गुडघे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शंकर झाल्टे आदींसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्?या आहेत.
तहसीलदारांची बदली स्थिगत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 17:13 IST
येवला : तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या मुदतपूर्व बदलीचा निषेध करून, मराठा मावळा संघटनेने तहसिलदार वारूळे यांची बदली रद्द करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदारांची बदली स्थिगत करण्याची मागणी
ठळक मुद्देपालकमंत्री छगन भुजबळ यांना सदर निवेदन देण्यात आले.