बारागावपंप्री परिसरात पोलीस गस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:40 IST2020-12-11T04:40:16+5:302020-12-11T04:40:16+5:30
------------------- आदिवासी कुटुंबाला मदतीचा हात सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील कमल सोमनाथ उघडे या आदिवासी कुटुंबाच्या घराला अचानक आग ...

बारागावपंप्री परिसरात पोलीस गस्तीची मागणी
-------------------
आदिवासी कुटुंबाला मदतीचा हात
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील कमल सोमनाथ उघडे या आदिवासी कुटुंबाच्या घराला अचानक आग लागल्याने दुचाकीसह संसारोपयोगी साहित्य, धान्य जळून खाक झाले. आमदार माणिकराव कोकाटे, शिवसरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्ष, जि. प. सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी या आदिवासी कुटुंबांला मदत म्हणून दैनंदिन वापरासाठी लागणारे साहित्य तसेच किराणा माल उपलब्ध करून दिला. हे साहित्य दापूर ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड व कार्यकर्त्यांच्या हस्ते उघडे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.
------------
छापा टाकताना पडल्याने पोलीस कर्मचारी जखमी
सिन्नर: मुसळगाव औद्योगिक वसाहतीतल्या एका जुन्या इमारतीत अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एक पोलीस कर्मचारी दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने जखमी झाला. या कारवाईत पोलिसांच्या हाती काही लागले नसले तरी विविध चर्चांना उधाण आले आहे. अन्य एक इसमही इमारतीवरून पडल्याने जखमी झाल्याचे समजते.
--------------------
शाळा अनुदानाच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी
सिन्नर: विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे, अनुदानाच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात व विनाअनुदानित शिक्षकांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्यावतीने शिक्षण संचालक द. गो. जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
----------------
सिन्नर तालुक्यात शाश्वत शेती अभियान
सिन्नर: राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत वावी, शहा व देवपूर परिसरात तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने शाश्वत शेती अभियान राबविण्यात आले. तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबविण्यात आला. प्रभारी जिल्हा विस्तार अधिकारी डॉ. बबनराव इल्ले यांनी डाळिंब, कांदा, टोमॅटो पिकाविषयी व रोपवाटिकांबाबत काळा करपा रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.
-----------
वावी येथे बजरंग दलाकडून स्वछता मोहीम
सिन्नर: तालुक्यातील वावी येथे बजरंग दलाच्यावतीने स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायतच्या मदतीने जेसीबीने परिसरातील काटेरी झुडपे काढून वाढलेल्या गवतावर तणनाशक मारून परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी धनंजय गायकवाड, गौरव केरे, विकास शिंदे, अभिजित ताजणे, यश रहाटळ, दीपक गायकवाड, अक्षय शिंपणकर, गणेश काटे, अमोल भोसले, भय्या काटे उपस्थित होते.