वर्गणीच्या विरोधात दंडाची मागणी

By Admin | Updated: April 9, 2017 00:27 IST2017-04-09T00:27:36+5:302017-04-09T00:27:46+5:30

नाशिक : बैठकीसाठी हजर न राहणाऱ्या व्यावसायिकांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा फर्मावल्याने सातपूर परिसरातील व्यावसायिक संभ्रमात सापडले आहेत.

The demand for a penalty against the sale | वर्गणीच्या विरोधात दंडाची मागणी

वर्गणीच्या विरोधात दंडाची मागणी

 नाशिक : राष्ट्रपुरुषांची जयंती वा पुण्यतिथीच्या निमित्ताने व्यावसायिकांकडून बळजबरीने होणारी वर्गणी वसुली रोखण्यासाठी एका नगरसेवकाने बोलाविलेल्या बैठकीकडे व्यावसायिकांनीच पाठ फिरविल्याने सदर नगरसेवकाने पुन्हा त्याच विषयावर बैठक आयोजित करून, बैठकीसाठी हजर न राहणाऱ्या व्यावसायिकांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा फर्मावल्याने सातपूर परिसरातील व्यावसायिक संभ्रमात सापडले आहेत.
सदर नगरसेवक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर वर्गणी वसूल करणाऱ्यांकडून जर व्यावसायिकांना त्रास झालाच तर आपण कोणतेही सहकार्य करणार नसल्याचे लेखी पत्रच व्यावसायिकांना वाटप केल्यामुळे एकीकडे वर्गणी वसुली करणाऱ्या समाजकंटकांचा त्रास व दुसरीकडे नगरसेवकाची धमकी अशा पेचात सापडून व्यावसायिक भयभीत झाले आहेत. कोणालाही कोणत्याही प्रकारची वर्गणी देऊ नये, यासाठी सदर नगरसेवकाने गेल्या रविवारी सायंकाळी सहा वाजता आपल्या प्रभागातील गणेश- श्रीकृष्ण मंदिरात व्यावसायिकांची बैठक बोलाविली होती. परंतु या बैठकीकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविली. त्यामुळे आता पुन्हा रविवार, दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता त्याच मंदिरात बैठक बोलाविण्यात आली असून, त्यासाठी नगरसेवकाच्या लेटरहेडवर प्रभागातील सर्व दुकानदार, व्यावसायिकांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात नगरसेवकाने गेल्या बैठकीला व्यावसायिक न आल्याचा उल्लेख करून ही बैठक तुमच्या फायद्यासाठीच असून, बैठकीस न आल्यास पाच हजार रुपये दंड करण्यात येईल, तसेच भविष्यात व्यावसायिकांना समाज कंटकांकडून व गुंडांकडून काही त्रास झाल्यास त्यामध्ये भाग घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Web Title: The demand for a penalty against the sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.