मीटररीडिंगप्रमाणेच वीजदेयके देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 09:41 PM2020-06-24T21:41:57+5:302020-06-24T21:44:57+5:30

सिडको : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सदोष तसेच वाढीव रकमेची देयके (बिल) देण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अचूक आकारणी करून मीटररीडिंगप्रमाणेच देयके देण्यात यावी, तसेच वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांनी विद्युत अधीक्षक अभियंता दरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for payment of electricity like meter reading | मीटररीडिंगप्रमाणेच वीजदेयके देण्याची मागणी

अधीक्षक अभियंता दरोली यांना निवेदन देताना सीमा हिरे. समवेत अविनाश पाटील, छाया देवांग, मनीषा देवरे,शिवाजी बरके, अमोल इघे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देआर्थिक भुर्दंड : वाढीव आकारणी केल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सदोष तसेच वाढीव रकमेची देयके (बिल) देण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अचूक आकारणी करून मीटररीडिंगप्रमाणेच देयके देण्यात यावी, तसेच वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांनी विद्युत अधीक्षक अभियंता दरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महावितरण कंपनीने तीन महिन्यांच्या लॉकडाऊनदरम्यान अव्वाच्या सव्वा रकमेची बिले आकारल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यातच महावितरणकडून वाढीव देयके आकारल्याने नागरिकांमध्ये संभ्रम असून, याबाबतीत सदोष वीजबिल आकारणीमुळे असंतोष पसरला आहे. महावितरणकडून ग्राहकांना अचूक वीजदेयके मीटररीडिंगनुसारच आकारण्यात यावी, सदोष आकारलेली बिले कमी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आमदार सीमा हिरे यांनी महावितरण अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले. यावेळी नगरसेवक छाया देवांग, राकेश ढोमसे, प्रकाश चकोर, हेमंत नेहते, परमानंद पाटील, तेजस निरभवणे, सुशील नाईक आदि उपस्थित होते.

Web Title: Demand for payment of electricity like meter reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.