सफाई कामगारांना वेतनवाढ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:18 IST2020-08-23T21:44:11+5:302020-08-24T00:18:20+5:30

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांत नाशिक शहराचा देशात अकरावा आणि राज्यात दुसरा क्रमांक  आला आहे. त्यामुळे सफाई कामगारांना एक वेतनवाढ देऊन त्यांना बक्षीसी द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केली आहे.

Demand for pay hike for cleaners | सफाई कामगारांना वेतनवाढ देण्याची मागणी

सफाई कामगारांना वेतनवाढ देण्याची मागणी

ठळक मुद्देयांसदर्भात बोरस्ते यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांत नाशिक शहराचा देशात अकरावा आणि राज्यात दुसरा क्रमांक  आला आहे. त्यामुळे सफाई कामगारांना एक वेतनवाढ देऊन त्यांना बक्षीसी द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केली आहे.
यांसदर्भात बोरस्ते यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. मुळातच शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सफाई  कामगारांची संख्या कमी आहे, अशा स्थितीत उपलब्ध कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्यानेच शहर स्वच्छ ठेवण्यात यश आले आहे.त्यामुळे या कामगारांना एक वेतनवाढ आणि प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करावे, अशी मागणीही बोरस्ते यांनी या पत्रामध्ये आयुक्तांकडे केली आहे.
गतवर्षी नाशिकला स्वच्छ शहर सर्वेक्षणामध्ये खूपच खालचा क्रमांक मिळाला होता. त्यामध्ये यंदा चांगलीच वाढ झाली आहे.

Web Title: Demand for pay hike for cleaners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.