दवाखान्यांमध्ये दरफलक लावण्याची मागणी; प्रांतांना निवेदन
By Admin | Updated: September 11, 2014 00:26 IST2014-09-10T22:40:13+5:302014-09-11T00:26:16+5:30
दवाखान्यांमध्ये दरफलक लावण्याची मागणी; प्रांतांना निवेदन

दवाखान्यांमध्ये दरफलक लावण्याची मागणी; प्रांतांना निवेदन
येवला : शहर व तालुक्यातील विविध दवाखान्यांत दरफलक लावावे, या मागणीचे निवेदन येथील सह्याद्री ग्रुपतर्फे प्रांताधिकारी वासंती माळी यांना दिले आहे.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे , दुखणे बरे झाले नाही तरी चालेल पण फी आवारा, असे म्हणण्याची वेळ सध्या रु ग्णांवर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पाशर््वभूमीवर आरोग्य उपसंचालकांनी प्रत्येक दवाखान्यात उपचाराचे दरपत्रक लावण्यास सूचित केले आहे. याची जाणीवपूर्वक अंमलबजावणी व्हावी, असेही निवेदनात म्हटले आहे. काही वेळेस अनावश्यक चाचण्या करण्यास रुग्णांना भाग पाडले जाते, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रांताधिकारी वासंती माळी व तहसीलदार शरद मांडलिक यांना निवेदन देताना अमोल गायकवाड, कृष्णा भुजबळ, संतोष गायकवाड,सुनील कोटमे, मंगेश माळोकर,दत्ता मुंगीकर आदिंसह सह्यांद्री ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दवाखान्यात दर्शनी भागात दरफलक लावावेत, ही मागणी तशी जुनीच आहे. याशिवाय रविवारी एखाद्या व्यक्तीला अचानकपणे उपचाराची गरज पडली तर डॉक्टर दवाखान्यात नसतात. रु ग्णांना २४ तास सेवा देण्याचे अभिवचन दिलेले असते ते केवळ कागदावर राहता कामा नये, ही अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.