आदिवासी भागात ऑक्सिजन निर्मिती केंद्रांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:42+5:302021-04-30T04:18:42+5:30
झिरवाळ यांनी पत्रात म्हटले आहे, अनेक रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत असताना रुग्णालयात ऑक्सिजन वायू पर्याप्त प्रमाणात उपलब्ध ...

आदिवासी भागात ऑक्सिजन निर्मिती केंद्रांची मागणी
झिरवाळ यांनी पत्रात म्हटले आहे, अनेक रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत असताना रुग्णालयात ऑक्सिजन वायू पर्याप्त प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे जीव गमवावे लागत असल्याची ओरड आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी भागात कृत्रिम ऑक्सिजन वायूची निर्मिती करणारे केंद्र स्थापन करावे, तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, सटाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी झिरवाळ यांनी केली आहे. याचबराेबर झिरवाळ यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याचीही मागणी केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २७ हॉस्पिटल्सला ५० टक्के व २५० हॉस्पिटल्सला ५० टक्के पुरवठा होत आहे, तो मागणीनुसार समप्रमाणात करावा, अशी मागणीही त्यांनी केली
इन्फो
राजकारणाची वेळ नव्हे!
ऑक्सिजन सिलिंडर देण्याच्या आवाहनास प्रतिसाद देत दिंडोरी-पेठ मतदारसंघातील कारखानदारांनी ७५ सिलिंडर जमा केले होते, त्यापैकी १३ सिलिंडर वणी ग्रामीण रुग्णालयात बसविण्यात आलेले आहेत. उर्वरित नाशिकला पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ८ नादुरुस्त निघाले. उर्वरित सिलिंडरचे काम सुरू असून, येत्या एक-दोन दिवसांत तेपण वापरात येतील. सध्या ही राजकारणाची वेळ नसल्याचेही झिरवाळ यांनी म्हटले आहे.