साकड नाला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

By Admin | Updated: June 27, 2014 00:11 IST2014-06-26T21:23:43+5:302014-06-27T00:11:54+5:30

साकड नाला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

Demand for open road for SAKAD Nallah road | साकड नाला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

साकड नाला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

 

देवळा : रामेश्वर-वाखारीरोड
ते भिलवाड रस्ता (साकड नाला रस्ता) वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा
या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांनी माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव अहेर यांच्या मध्यस्तीनंतर व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या तीन दिवसांत कार्यवाही करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आपले उपोषण मागे घेतले.
साकड नाल्यात अतिक्रमण केल्याने अनेकवेळा तहसीलदारांकडे तक्र ार करूनही उपयोग होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी उपोषण सुरू केले होते. यात साहेबराव नामदेव निकम, सोमनाथ कारभारी शिंदे , दादाजी चिंधा भामरे, निंबा सोनू निकम, उत्तम सोनू निकम, भास्कर दाजी निकम, अमृता चंद्रभान शिरसाठ, पांडुरंग वामन अहेर, सुरेश मोतीराम गोसावी, शंकर बाबूराव अहिरे आदि दहा शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून देवळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते.
तीन दिवस होऊनही शासनाचा अधिकारी उपोषणस्थळाकडे न फिरकल्याने अहेर यांनी मध्यस्थी करून उपविभागीय अधिकाऱ्यास बोलावून
घेतले.
सर्वांची भूमिका समजावून घेत तीन दिवसांत संबंधित शेतकऱ्यास मोजणीची फी भरण्याची मुदत देण्यात येईल व त्याकाळात त्याने फी भरली नाही, तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शासकीय मोजणीबाबत आदेश देऊन रस्ता खुला करण्यात येईल,असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले.
यावेळी झालेल्या चर्चेत दौलतराव अहेर, वाखारीचे माजी सरपंच मंगेश अहेर, सामाजिक कार्यकर्ते निंबाजी अहेर, नाशिक मनपाचे प्रभाग सभापती डॉ. राहुल अहेर, तहसीलदार शर्मिला भोसले, नीलिमा अहेर, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील देवरे, जिल्हा नेते दिनेश देवरे, संजय निकम, भिवराज शिरसाठ, मोठाभाऊ भामरे, हरी अहेर, योगेश भामरे, बाजीराव शिरसाठ आदिंनी सहभाग घेतला.
दरम्यान, आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना अलकाबाई शिंदे, प्रमिला देवरे, शोभा शिरसाठ, रंजना शिरसाठ, सुनंदा भामरे, रत्नाबाई निकम, जानकाबाई निकम, तुळसाबाई निकम, वानूबाई निकम, सरूबाई देवरे, कमळाबाई देवरे, जयश्री निकम, जिजाबाई निकम आदिंसह शेकडो महिलांनी पाठिंबा दिला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for open road for SAKAD Nallah road