धाडसी मुलींना राष्टÑपती पुरस्कार देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:40 IST2017-10-27T00:39:55+5:302017-10-27T00:40:13+5:30
अजंग शिवारातील ढवळीविहीर शिवारात महिला शेतमजुरांना नेणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीला झालेल्या अपघातात समयसूचकता व धाडस दाखवून पाच महिलांचे प्राण वाचविणाºया निकिता सोनवणे, सपना पगारे व त्यांना मदत करणाºया गायत्री मांडवडे यांचा राज्य शासनाने राष्टÑपती शौर्य पदक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विनोद वाघ यांच्यासह पदाधिकाºयांनी प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धाडसी मुलींना राष्टÑपती पुरस्कार देण्याची मागणी
मालेगाव : अजंग शिवारातील ढवळीविहीर शिवारात महिला शेतमजुरांना नेणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीला झालेल्या अपघातात समयसूचकता व धाडस दाखवून पाच महिलांचे प्राण वाचविणाºया निकिता सोनवणे, सपना पगारे व त्यांना मदत करणाºया गायत्री मांडवडे यांचा राज्य शासनाने राष्टÑपती शौर्य पदक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विनोद वाघ यांच्यासह पदाधिकाºयांनी प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंगळवारी ढवळीविहीर शिवारात दुर्दैवी घटना घडली. या घटनेत सात महिलांचा मृत्यू झाला. या अपघातातील कमळ गोविंद, ताई मांडवडे, वंदना सोनवणे, सुवर्णा बंदरे, व अन्य दोन महिलांचे या मुलींनी धाडस दाखवून प्राण वाचविले. त्यामुळे या मुलींचा सन्मान करून राष्टÑपती शौर्य पदक द्यावे, अशी मागणी वाघ यांच्यासह दत्ता चौधरी, यशपाल बागुल, किरण पाटील, विकी चव्हाण, राहुल गायकवाड, सागर पाटील, युवराज देवरे, जिभाऊ रौंदळ, कल्पेश पाटील, अंकुश शिंदे, मनोज जगताप, दीपक अहिरे, दिनेश बोरसे, शिरीश पाटील आदींनी केली आहे.